काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या ताफ्यात अपघात, रामपूरला जाताना दुर्घटना, जीवितहानी नाही
लखनौ : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीच्या ताफ्यात अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशातील हापूड रोडवर ही घटना घडली. प्रियांका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. मात्र या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. माहितीनुसार ताफ्यातील पुढच्या गाडीचालकाने अचानक ब्रेक लावला, त्यामुळं मागील गाड्या एकमेकांवर आदळल्या. ही घटना प्रियांका गांधी रामपूरला ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या नवरीत सिंहच्या परिवाराला भेटण्यासाठी जात असताना घडली.
Tags :
Rampur Priyanka Gandhi Clothes Priyanka Vadra Priyanka Gandhi Vadra Priyanka Gandhi Viral Video Hathras