बाबरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे - अबू आझमी
मुंबई: बाबरी मशीद पाडल्याचा अभिमान मुख्यमंत्र्यांना भोवणार असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या विधानावर कॉंग्रेस नेते संजय निरुपम आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले की, "काल मुख्यमंत्र्यांनी बाबरी उद्धस्त केल्याचा जल्लोष केला आणि उपस्थित कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्या भाषणाचा आनंद घेतला. हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे? ओवैसींच्या विषारी रोपट्याचा वाढ होण्यासाठी हे पोषक नाही का?"