वांद्रे स्टेशन गर्दी प्रकरणात एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निर्दोष, काय होतं प्रकरण?
वांद्रे स्टेशनवर 14 एप्रिलला गर्दी जमा झाली होती. त्यावरून पोलिसांनी एकूण तीन गुन्हे दाखल केले होते. त्यात राहुल कुलकर्णी यांच्याविरोधात 117,188,269,505 (2) भादवि सह साथिचे रोग अधिनियम 1897 ही कलमे लावण्यात आली होती. या कलमांप्रमाणे 148 प्रमाणे नोटीस देणे आवश्यक होते. परंतु सर्व नियमांचा भंग करुन पोलिसांनी राहुल कुलकर्णी यांना 15 एप्रिलला पहाटे उस्मानाबाद येथील माझ्या घरून अटक केली. त्यानंतर नियमांप्रमाणे 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल होणे अवश्य होते. तसे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले. ह्या 90 दिवसाच्या तपासात पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपास केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात राहुल कुलकर्णी यांचा संबंध नसल्याचे मान्य केले आहे.