Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 सप्टेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha

Continues below advertisement
स्मार्ट बुलेटीन : 18 सप्टेंबर 2020 | मुख्य बातम्या

1. इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची आज पायाभरणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पायाभरणी सोहळा पार पडणार

2. आजपासन एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेनं सुरु होणार, राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय, एका सीटवरून दोन प्रवाशांना प्रवास करता येणार

3. देशातील कोरोनाचे वाढते संकट आणि कोसळलेली अर्थव्यवस्थेवरून शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका; 'आम्ही दिल्लीचे गोंधळी' म्हणत 'सामना'तून हल्लाबोल

4. पोलीस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13 टक्के जागा रिक्त, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती, तर जागा रिक्त ठेवणं बेकायदेशीर मराठा आरक्षणाविरोधी याचिकाकर्त्याच्या आरोप

5. स्थगिती हटेपर्यंत नोकर भरतीची घाई करण्याची गरज नव्हती, संभाजी राजेंच्या सूरात फडणवीसांचा सूर, राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये मराठा संघटनांचं तीव्र आंदोलन

6. मुंबईत जमावबंदीचा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला, जमाबंदी दरम्यान व्यवहार सुरळीत राहणार, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होणार

7. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुणे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सकाळी सहा वाजताच कामाचा आढावा, व्यवस्थापकीय संचालकांसह महत्त्वाचे अधिकारीही कार्यालयात हजर

8. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती, तर अभिनव देशमुख पुणे ग्रामीण पोलीस प्रमुख पदी

9. अभिनेत्री कंगना रनौतची पुन्हा राज्य सरकारवर टीका, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर असल्याचं म्हणत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटची लागू करण्याची मागणी

10. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 3 कोटींच्या पुढे, तर आतापर्यंत 9.50 लाख लोकांचा मृत्यू; तर 2 कोटी 20 लाख रुग्ण कोरोनामुक्त
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram