ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 18 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 18 May 2025
बीडच्या परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. समाधान मुंडे (Samadhan Munde) आणि त्याच्या टोळक्याने शिवराज दिवटे (Shivraj Divate) याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणी शिवराज दिवटे हा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी रविवारी या रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे याच्या तब्येतीची विचारपूस केली. (Beed news in Marathi)
मनोज जरांगे हे शिवराज दिवटेला पाहण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आले तेव्हा याठिकाणी मराठा बांधावांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'एक मराठा लाख मराठा', 'परळीच्या कुत्र्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय', अशा आक्रमक घोषणांनी परिसर रुग्णालयाचा दणाणून गेला होता.