Sanjay Rathod | तपास पूर्ण होईपर्यंत बोलणं चुकीचं,संजय राठोड प्रकरणावर अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर

Continues below advertisement

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी विविध आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड  यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी होत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे. भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार हे नक्की.  संपूर्ण अधिवेशन संजय राठोड यांच्या मुद्दाने गाजण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram