इंग्लंडमधील प्रवासाची पार्श्वभूमी असलेला तरुण कोरोनाबाधित, नव्या स्ट्रेनची लागण झाल्याची शक्यता
Continues below advertisement
नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला नागपूरमधील 28 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची अनेकांना लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण कोरोनाच्या नवीन प्रकाराने बाधित असल्याचा संशय आहे. या कोरोना संशयितामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. बाधित तरुणावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा तरुण इंग्लंडमधून आल्यानंतर नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आला होता. या तरुणाच्या संपर्कात आलेले कुटुंबातील सदस्यांसह इतर काही जणही कोरोनाबाधित झाले आहेत.
Continues below advertisement
Tags :
UK Virus New Corona Strain New Corona Maharashtra Curfew Uk Coronavirus New Coronavirus Who Curfew Curfew In Maharashtra