तुमचा पगार भरघोस वाढण्याची शक्यता! 2021 मध्ये 88% कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी अनुकूल

Continues below advertisement

नवी दिल्ली: भारतातील खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जवळपास 88 टक्के भारतीय कंपन्या या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढ करण्यास अनुकुल आहेत. एऑन या व्यावसायिक सर्व्हे करणाऱ्या कंपनीच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा फटका बहुतांश सर्व उद्योगांना बसला होता. त्यामुळे आर्थिक मंदी सदृष्य परिस्थिती तयार झाल्याने अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. देशातील सर्वच खासगी उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 40 टक्क्यांपासून ते 60 टक्क्यांपर्यंत कपात केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram