India-China Border | भारताच्या सीमेवर चीनमधून 60हजार सैन्य तैनात, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची माहिती
अमेरिकचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियोनी म्हंटले आहे की चीनने भारताच्या उत्तर सीमेवर 60 हजार सैनिकांना तैनात केले आहे. टोकियो येथे संपन्न झालेल्या क्वॉड देशांच्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या काही काळात चीनने केलेल्या हरकतींवर त्यांनी टीका केली. चीनच्या या कृत्यामुळे क्वॉड देशांसमोर आव्हान निर्माण झाल्याचंही ते म्हणाले. मंगळवारी क्वॉड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची जपानच्या टोकियो येथे बैठक पार पडली.