Indian Navy Sailors Corona Positive | भारतीय नौदलातील 21 जवानांना कोरोनाची बाधा
मुंबई : कोरोना व्हायरसने भारतीय नौसेनेतही शिरकाव केला आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस आंग्रे या मुंबईतल्या तळावरच्या 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यापैकी 20 जण हे नौसैनिक म्हणून नौदलाच्या सेवेत आहेत. 7 एप्रिल रोजी आयएनएस आंग्रे येथील एक नौसैनिक कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं होतं. त्याच्याच संपर्कातून अन्य नौसैनिकांनाही कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.