नाशिक : अपघातग्रस्त कामगारांचं भीक मांगो आंदोलन
Continues below advertisement
नाशिकमधील अपघातग्रस्त कामगारांनी आज कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर भीक माँगो आंदोलन केलं. गेल्या २० वर्षात नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत काम करताना अपघात होवून दिड हजारापेक्षा अधिक कामगारांना अपंगत्व आलं. यामुळं कायमचे जायबंदी झालेल्या, तसेच अंधत्व येऊन शेकडो कामगारांचे आयुष्य उध्वस्त झालं. अपंगत्व आलेल्या कामगारांना संबंधित कंपन्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं. त्यामुळं अपंगत्व आलेल्या कामगारांनी औद्योगिक अपघातग्रस्त कामगार संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून अपंगत्व आलेल्या कामगारांनी भीक मांगो आंदोलन केलं.
Continues below advertisement