मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीटू मोहिमेत हस्तक्षेप करावा : शक्ती कपूर

बॉलिवूडमध्ये नेहमीच ‘बॅड बॉय’ म्हणून परिचीत असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी मीटू अभियानावर काही प्रश्न उपस्थित करत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. त्याबाबतची ऑडिओ क्लिप शक्ती कपूर यांनी एबीपी न्यूजकडे पाठवली आहे.
“अशा प्रकारणांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे आरोप केल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करता, जोवर कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत बदनामी रोखावी, मग तो कोणी कलाकार, व्यावसायिक किंवा नेता असो, कोर्टात सिद्ध झाल्यानंतरच नाव जाहीर करावं”, असं आवाहन शक्ती कपूर यांनी केलं आहे.
शक्ती कपूर यांनी 1.55 मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये केलं आहे.शक्ती कपूर यांनी स्वत:वर ओढवलेल्या परिस्थितीचाही दाखला दिला आहे. सध्या अनेकांवर आरोप होत आहेत. दिग्दर्शक साजिद खानला सिनेमातून वगळलं, हृतिक रोशनवर आरोप झाले, अमिताभ बच्चन यांचंही नाव आलं आहे, उद्या मोदीसाहेब तुमच्यावरही आरोप होतील, तर तुम्ही काय करणार? असा प्रश्न शक्ती कपूर यांनी विचारला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola