मुंबई | आलोकनाथ मद्यधुंद अवस्थेत खोलीत शिरले : संध्या मृदुल
मी टू प्रकरणात आता अभिनेते आलोकनाथ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे..कारण अभिनेत्री संध्या मृदूल यांनीही आलोकनाथ यांच्यावर आरोप केलेयत...ट्विट करत त्यांनी हे आरोप केले आहेत..अनेक वर्षांपूर्वी आऊटडोअर शूटदरम्यान आलोकनाथ यांनी मद्यधुंद अवस्थेत आपल्या खोलीत शिरल्याचा आरोप संध्या मृदुल यांनी केलाय...तसंच त्या दिवसाच्या प्रसंगानंतर रात्री अपरात्री आलोकनाथ यांनी आपल्याला फोन करुन छळ केल्याचा आरोपही त्यांनी केलाय..दोनच दिवसांपूर्वी विनता नंदा यांनीही आलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप केले होते..