मुंबई : अजित वाडेकर महान क्रिकेटर होतेच, पण उत्तम व्यक्ती पण होते : सचिन तेंडुलकर
भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी वाडेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या अंत्ययात्रेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली. यावेळी सचिनने अजित वाडेकर यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.