मुंबईतील विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
Continues below advertisement
बहुप्रतिक्षित मुंबईचा विकास आराखडा अखेर मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई डीपी प्लॅन 2034 च्या छाननी समिती अहवालाला हिरवा कंदील दाखवला. समितीकडून या नव्या डीपी प्लॅनची घोषणा आज मंत्रालयात होण्याची शक्यता आहे. खुल्या जागेचं अरक्षण, शाळा आणि बागेचे भूखंड, हेरिटेज वास्तू वगळण्यात येणं, खाजगी भूखंडावरुन सार्वजनिक रस्ते अशा विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे त्याचा अंतिम आराखडा तयार होण्यास विलंब झाला.
Continues below advertisement