मुंबई | #MeToo : हिमानी शिवपुरींचाही आलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप
निर्मात्या विनता नंदा आणि अभिनेत्री संध्या मृदुल यांच्या आरोपानंतर आता अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनीही ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आलोकनाथ यांनी एनएसडीमध्ये शिकत असताना रुममध्ये घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिमानी शिवपुरी यांनी केला आहे.