Congress Protest | कर्नाटकमधील आमदार असलेल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शनं | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत ज्या सोफिटेल हॉटेलमध्ये हे आमदार थांबले आहेत, तेथे महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांनी दिलेला राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी या कार्याकर्त्यांनी केली. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर सोफिटेल हॉटेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर हॉटेलच्या दिशेने येणाऱ्या सर्व रस्त्यांवरही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram