मुंबई : खड्ड्यात कमळ ठेवून काँग्रेसचं अनोखं आंदोलन

Continues below advertisement
किती सरकार आले,.. किती गेले.. पण मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेल्या खड्ड्यांवर कुणालाच इलाज सापडत नाहीए. सुप्रीम कोर्टानं झापलं... हायकोर्टानं फटकारलं मात्र खड्डे जैसे थेच... आता मुंबईकरही खड्ड्यांच्या नावानं बोंब मारुन थकलेत... पण हे सगळं इथंच थांबत नाही... कारण मुंबईतल्या खड्ड्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय भयानक होतेय.. मुंबईतल्या खड्ड्यांकडे पालिका आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसनं रस्त्यावर बसून अनोखं आंदोलन केलं... मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वाखाली खड्डे पडलेले रस्ते बुजवून त्यावर भाजपचा निषेध म्हणून कमल लावले.. शिवाय किर्तन, भजन करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला...घाटकोपरमधील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जास्त खड्डे पडलेल्या चौकांना विश्वनाथ महाडेश्वर चौक असे नामकरण करणारे फलक लावले होते. घाटकोपर परिसरातील भटवाडी, पारशीवाडी, रेल्वे स्थानक परिसर, असल्फा या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत.
दरम्यान मुंबई आणि दिल्लीतल्या खड्ड्यांवरून सुप्रीम कोर्टानंही केंद्र सरकारला झापलं.. आणि खड्ड्यांची माहित कोर्टात सादर करण्याचे आदेश दिलेत...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram