मुंबई | गणेशोत्सवात इको-फ्रेंडली बाप्पाची प्रतिष्ठापना करा, वरूण-अनुष्काचं आवाहन

सुई धागा सिनेमातील वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी इको फ्रेंडली गणपतीच्या स्थापनेवर भर दिलाय,.. मुंबईतल्या ओबेरॉय मॉलमध्ये सुई धागा सिनेमाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात दोन्ही कलाकार बोलत होते.. यावेळी अनुष्का आणि वरुण यांनी इको-फ्रेंडली गणपतीमुळे होणारे फायदे उपस्थितांना सांगितले... तसंच पर्यावरण जपण्याची जबाबदारी ही सर्वात आधी आपली आहे, आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासही सर्वांनी मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलंय.. यावेळी अनुष्का आणि वरुणलाही इको-फ्रेंडली गणेशाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola