माझा विशेष | जलयुक्त शिवारचा बोजवारा उडालाय का?

जलयुक्त शिवारमुळे 16 हजार गावं दुष्काळमुक्त झाल्याचा फडणवीस सरकारचा दावा फोल असल्याचं समोर आलं आहे. मागील पाच वर्षांचा भूजल पातळीचा अभ्यास केल्यानंतर यावर्षी 14 हजार गावांतील भूजल पातळीत 1 मीटर घट आढळून आल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने दिला आहे. सप्टेंबर 2018 च्या अखेरीस आणि ऑक्टोबर महिन्यात सादर केलेल्या सर्वेक्षणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 201 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. त्यापैकी 170 तालुक्यांमध्ये अतिशय तीव्र पाणीटंचाई आहे. भूजल सर्वेक्षण विभाग ही सरकारची यंत्रणा असून त्यांनी सरकारला अहवाल दिला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola