Modi in Kedarnath | मोदींना निकालाची धास्ती म्हणून केदारनाथाची भक्ती? | माझा विशेष | ABP Majha
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका उद्या आहेत आणि 23 तारखेला जनता कौल देणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींनी केदारनाथ बाबांचा धावा केला. हिमाचली पोशाखात मोदींनी केदारनाथच्या गाभाऱ्यात विशेष पूजा-अर्जा केली. मंदिर प्रदक्षिणा घातली. मोदी केदारनाथमध्ये ध्यान केलं. त्यानंतर केदारनाथमधल्या विकासकामांचा आढावा घेतला.
त्यानंतर एका हातात सतरंगी छत्री आणि दुसऱ्या हातात काठी घेत मोदींनी केदारनाथ गुहेच्या दिशेनं चढाई केली. आज रात्रभर मोदींचा गुहेत मुक्काम असणार आहे. रात्रभर मोदी गुहेत साधना करणार आहेत. त्यानंतर मोदी सोमवारी बद्रिनाथला जातील.