VIDEO | शरद पवारांचा स्वार्थ, पार्थ आणि परमार्थ | माझा विशेष | एबीपी माझा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. "मी माढ्यातून निवडणूक लढवावी असा सगळ्यांचा आग्रह आहे. मात्र पक्षाने अद्याप माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही. आम्ही कुटुंबात बसून चर्चा केली. मी स्वत: उभं न राहता नव्या पिढीला संधी द्यायचं ठरवलं आहे," असं शरद पवार यांनी सांगितलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. तसंच माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांना आम्ही एकत्र केलं. दोन दिवसांत माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असेल याबाबत निर्णय घेऊ, असं पवारांनी स्पष्ट केलं.