VIDEO | राजकीय पक्ष आचारसंहिता जुमानत नाहीत? | माझा विशेष | एबीपी माझा
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव.. निवडणुका. 91 लोकसभा मतदारसंघ, एकूण 1279 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होतंय. आज प्रामुख्यानं ज्या भागात निवडणुका होत आहेत ते भाग संवेदनशील समजले जातात. एकूण 91 पैकी 37 जागा संवेदनशील आहेत. पण केवळ मतदार संघच संवेदनशील आहेत असं नाही. तर गंभीर गुन्हे असलेले अनेक उमेदवारही निवडणुकांच्या रिंगणात आहेत. आज दिवसभरात अऩेक ठिकाणी हिंसाचार झालेत. नक्षलग्रस्त भागात एका मतदान केंद्राजवळ बॉम्बस्फोट झाल्याचं समोर आलं. तेलंगण आंध्रप्रदेश या राज्यात तर उमेदवाराचे फोटो छापलेल्या दारूच्या बाटल्या मतदारांना वितरीत करण्यात आल्या. हे सगळं पाहता प्रश्न असा उरतो की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही दारू, पैसा आणि हिंसेशिवाय निवडणूक पार का पडू शकत नाहीत? राजकीय पक्ष आचारसंहिता जुमानत नाहीत का?