VIDEO | विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी वानखेडे स्टेडियमवर | खेळ माझा | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
भारताच्या २०११ सालच्या वन डे विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज पुन्हा वानखेडेवर उतरला. निमित्त होतं आयपीएल सामन्याआधीच्या सराव सत्राचं. आठ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विश्वचषकावर दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं होतं. याच दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन वानखेडे स्टेडियमचे पीच क्युरेटर रमेश म्हामुणकर यांनी महेंद्रसिंग धोनी आणि भारताच्या विश्वचषक विजेत्या संघातल्या खेळाडूंना ग्राऊंड स्टाफसोबत छायाचित्र काढण्याची विनंती केली. ती त्यांनी तातडीनं मान्य केली. या खास फोटोसेशनमध्ये आपण युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांना मिस केल्याचं त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement