Heart Transplant from Pig : आश्चर्यच! डुकराचे हृदय बसवले माणसाला, अमेरिकेत यशस्वी प्रयोग
Heart Transplant from Pig : एका 57 वर्षाच्या व्यक्तीला डुकराचे (Pig ) हृदय बसवण्यात आले आहे. जगातील हा पहिलाच प्रयोग अमेरिकेत (United States) झाला आहे. अमेरिकेतील औषध नियामक संस्थेने नव्या वर्षाच्या सुरूवातीला या सर्जरीला परवानगी दिली होती. त्यानुसार मागच्या शुक्रवारी डॉक्टरांनी डुकराचे हृदय या व्यक्तीच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण करून त्याचे प्राण वाचवले. डेव्हिड बेनेट असे हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने सोमवारी एक निवेदन जारी करून या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली. हृदय प्रत्यारोपणाची सर्जरी झाल्यानंतर तीन दिसांनी संबंधित रूग्ण व्यवस्थित झाला. या यशस्वी सर्जरीनंतर आता अवयव दानातील कमतरता भरून निघेल अशी शास्त्रज्ञांना आशा आहे.
हृदय प्रत्यारोपण केलेले डॉ. बार्टले ग्रिफिथ सांगतात, हृदय दान करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. या प्रयोगाने अवयव दानाची कमतरता भरून निघणार आहे. हा प्रयोग भविष्यात रूग्णांसाठी महत्वाचा आहे.