Corona Update : कोरोना आता सामान्य आजार, कोरोना यापुढे आणीबाणी नाही : WHO : ABP Majha
Continues below advertisement
कोरोना आता वैद्यकीय आणीबाणी नाही, असा महत्त्वाचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं घेतला आहे... २०१९ पासून अडीच वर्ष जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना आता पूर्वीइतका गंभीर राहिलेला नाही, असा याचा अर्थ आहे... ३० जानेवारी २०२० रोजी कोरोना ही वैद्यकीय आणीबाणी असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेनं केली होती... मात्र, आता कोविड-१९ हा सामान्य आजार झालाय, असं जगभरातील डॉक्टरांचं निष्कर्ष आहे... त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीने कोरोना वैद्यकीय आणीबाणी नसल्याचा निर्णय घेतलाय...
Continues below advertisement