Tomato Flu Symptoms : टोमॅटो फ्लूची लक्षणं काय? फ्लू झाल्यास काय काळजी घ्याल? ABP Majha

आणि आता पालकवर्गासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. कोरोनानंतर मंकीपॉक्स आणि त्यानंतर आता आणखी एका रोगाचं संकट घोंघावू लागलं आहे. या रोगाचं नावय हँड फूट माऊथ डिसिज. त्यालाच टोमॅटो फीव्हर असंही म्हणतात. सर्दी, ताप, अंगदुखी आणि थकवा ही या रोगाची लक्षणं आहेत. चिंतेची बाब म्हणजे हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये वेगानं पसरतो. त्यामुळंच सध्या मुंबई आणि ठाण्यातल्या लहान मुलांमध्ये टोमॅटोे फ्लूचा प्रसार अधिक होताना दिसून येतोय. या फ्लूमध्ये लहान मुलांच्या अंगावर लाल फोड येऊन, त्यांना तापही येतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola