
Monkey Pox : मंकीपॉक्सचा संसर्ग थांबवण्यासाठी सेक्स पार्टनर्सची संख्या कमी ठेवा, WHOचा सल्ला
Continues below advertisement
कोरोनानंतर जगभरात मंकीपॉक्सनं धुमाकूळ घातलाय.. जगातल्या 78 देशात 18 हजार जणांना मंकीपॉक्सचा संसर्ग झालाय... या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं एक महत्वाचा सल्ला दिलाय... मंकी पॉक्सचा संसर्ग थांबवण्यासाठी आपल्या सेक्स पार्टनर्सची संख्या कमी ठेवा असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसियस यांनी केलंय. जगभरातील मंकीपॉक्स रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांमध्ये लैंगिक संबंधांमुळे विषाणूचा संसर्ग झाल्याची माहीती डब्ल्यूएचओनं दिलेय. भारतात या विषाणूचा धोका वाढला नसला तरी त्याचा शिरकाव झालेला आहे.. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
Continues below advertisement