PM Modi Independence Day : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांकडून मोठी आरोग्य योजना जाहीर होण्याची शक्यता

Independence Day 2022 : देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झालीत पण अजूनही आपल्या देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था (Samagra health scheme ) पाहिजे त्या प्रमाणात सुधारली नसल्याचं चित्र आहे. ग्रामीण भागात तर आरोग्य व्यवस्था न सांगितलेली बरी....! आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 140 कोटींच्या घरात पोहोचली आहे. अशातच इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या मानाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोकडी असल्याचं आपल्याला गेल्या अडीच वर्षाच्या कोरोना काळात दिसून आलं. अनेक ठिकाणी रुग्णालये नसल्याने तर कुठे रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल झालेत. गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेनं आपल्याला सर्व काही शिकविले आणि यातून धडा घेऊन केंद्र सरकारने आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola