Omicron च्या ‘BA.2’ या व्हेरियंटचा भारतात शिरकाव, अनेक रुग्ण आढळल्याचं इन्साकॉगच्या अहवालात नमूद
Continues below advertisement
मोठ्या शहरात झपाट्याने पसरणारा ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर आहे असा इशारा इन्साकॉगने दिलाय. ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत, परंतु सध्या मात्र रुग्णालयात दाखल होणारे आणि अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धोका कायम आहे, असेही इन्साकॉगने आपल्या अहवालात नमूद केलंय. संसर्गक्षमता अधिक असलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीए.टू’ या व्हेरियंटचे अनेक रुग्ण देशात आढळल्याचंही या अहवालात म्हटलंय.
Continues below advertisement