Bluetooth Earphone Blast : गाणी ऐकताना वायरलेस इयरफोनचा कानात स्फोट, तरुणाचा मृत्यू, जयपूरमधील घटना
ब्ल्यू टूथनं मोबाईल फोनला कनेक्ट होणारे ईयरफोन तुम्ही वापरता का? किंवा तुमच्या घरात कोणीही अशाप्रकारचे ईयरफोन वापरत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे... कारण गाणी ऐकताना ईयरफोनचा कानात स्फोट होऊन एका तरुणाचा मृत्यू झालाय... राजस्थानातल्या जयपूरच्या चोमू परिसरात घडलेल्या घटनेची सध्या देशभर चर्चा सुुरु आहे.. या दुर्घटनेत मृत्यू पावलेला राकेश नागर गाणी ऐकत होता.. अचानाक ईयर फोनचा स्फोट झाला आणि गंभीर जखमी झाल्यानं त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं.. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत मोबाईल, बॅटरी आणि तत्सम उपकरणांचा स्फोट होऊन अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं आपण ऐकलं होतं.. मात्र हेडफोनचा स्फोट होऊन एखाद्याचा जीव जाण्याची देशातली ही पहिलीच घटना असल्याचं समजतंय.