Fairness Cream Kidney Dieses Special Report : फेअरनेस क्रीम वापरताय? होऊ शकतात किडनीचे आजार

Fairness Cream Kidney Dieses Special Report : फेअरनेस क्रीम वापरताय? होऊ शकतात किडनीचे  आजार

तुम्हाला गोरं व्हायचंय का?... त्यासाठी तुम्ही फेअरनेस क्रीम वापरता का?... तसं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे... आणि भविष्यात तुम्ही फेअरनेस क्रीम वापरणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीही आहे.... ही बातमी तुम्हाला सावध करणारी आहे...  फेअरनेस क्रिम वापरण अगदी आजच बंद कराल... कारण या फेअरनेस क्रिममुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढलाय... डॉक्टरांच्या निरीक्षणातून हे समोर आलंय... अकोल्यात एका तरुणीनं ब्युटीशिअनकडून फेअरनेस क्रिम विकत घेतली... या क्रिमच्या वापरानंतर तिचा चेहरा उजळलाही... मात्र, चेहरा उजळल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही... कारण अवघ्या ३ ते ४ महिन्यांत तिचा चेहरा सूजला... ती आजारी पडली... खरं तर या क्रिममुळे तिच्या किडनीवर थेट परिणाम झाला... तिच्यासह तिची आई आणि बहिण यांनीही क्रिम वापरल्याने त्यांच्याही किडनीला इजा झालीये. त्यामुळे डॉक्टरांकडून अशा क्रीम न वापरण्याचा सल्ला दिला जातोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola