COWIN : कोविन अॅपमध्ये एका क्रमांकावर आता सहा जणांची नोंदणी, सरकारकडून अॅपमध्ये अनेक सुधारणा
abp majha web team
Updated at:
22 Jan 2022 09:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारनं कोविन अॅपमध्ये नव्या सुधारणा केल्या आहेत. आता एका मोबाईल क्रमांकावरून 6 जणांची नोंदणी कोविन अॅपवर करता येणार आहे. यापूर्वी एका मोबाईल क्रमांकावर केवळ 4 जणांची नोंदणी करता येत होती. याशिवाय आणखी एक महत्वाची सुधारणा केंद्र सरकारनं केलेय. नागरिकांना कोविन अॅपमधून आता लसीकरणाचं स्टेटस बदलता येणार आहे. तांत्रिक चुकीमुळे नागरिकांचं पूर्ण लसीकरण झाल्याचं किंवा न झाल्याचं बरेचदा अॅपवर दिसतं अशावेळी चूक असल्यासा नागरिकांना त्यात योग्य ते बदल करण्याची सोय आता असणार आहे. आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीची तपासणी होऊन चार दिवसात बदल अॅपवर दिसणार आहेत.