Breast Cancer : रक्तातून करता येणार कर्करोगाची चाचणी, नाशिकच्या दातार कॅन्सर जेनेटिक्सचं तंत्रज्ञान

Continues below advertisement

इतर आजारांप्रमाणेच आता स्तनांच्या कर्करोगाची चाचणीही रक्तातून करता येणार आहे. नाशिकच्या दातार कॅन्सर जेनेटिक्स या कंपनीने 2 वर्षांच्या संशोधनातून याची चाचणी यशस्वी केलीय. स्तनांच्या कर्करोगाची अनेकदा लक्षणं दिसत नाहीत. यातून जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पहिल्या पातळीवरच कर्करोगाचं निदान करता यावं यादृष्टीने नाशिकच्या दातार कॅन्सर जेंटिक्स कंपनीने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत तपासणी विकसित केली. यावेळी रक्त तपासणीमध्ये स्तनांचा कर्करोग असणाऱ्या महिलांच्या रक्तात आढळणाऱ्या विशिष्ट ट्युमर पेशी आणि पेशी समूह अत्यंत अचूकपणे शोधले जातात. गेल्या दीड वर्षांत 20 हजारांहून अधिक महिलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. या चाचण्या यशस्वी झाल्या असून त्याची दखल थेट अमेरिकेच्या अन्न औषध प्रशासन विभागाने घेत ब्रेक थ्रू डिजिग्नेशन दिलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram