Ratnagiri Kumbharli Ghat | हिरवेगार डोंगर आणि कोसळणारे धबधबे, रत्नागिरीच्या कुंभार्ली घाटाचं नयनरम्य रुप!
Continues below advertisement
कोकणचा प्रवास म्हणजे डोंगर कपारीतुन काढलेला मार्ग, या पडलेल्या पावसामुळे कोकणातून प्रवास करताना आपल्या नजरेस पडते हिरवळीची चादर, निसर्गाच्या अद्भुत आविष्काराचा नजरेस पडलेला देखावा आपल्या नयनांना भुरळ घालणारा असतो. अशाच काही नागमोडी वळणातून प्रवास करताना अनेक घाट माथे पावसामुळे हिरवळीने बहरले आहेत. त्यापैकीच एक कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाट, या सह्याद्रीच्या कड्या कपारीतुन नागमोडी वळणाचा काढलेला घाट मार्ग. या काळ्याभिन्न सह्याद्रीच्या कड्यावर आता पावसाळ्यात हिरवी शाल पांघरली आहे. उंचच उंच कडे आणि त्यातून फेसाळणारे धबधबे म्हणजे शंकराच्या जटेतून वाहणारी गंगाच! कुंभार्ली घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पावसाळ्यात हा घाट पर्यटकांसाठी नयन मनोहारी पर्वणी घेऊन येतो. या घाटाचे वैभव काही औरच आहे.
Continues below advertisement