Google Map चा भन्नाट फिचर, प्रवासाआधीच समजणार Toll ची रक्कम : ABP Majha
Continues below advertisement
गुगल मॅपमुळे अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायी वाटतो. रस्ता शोधणे, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मार्गावर ट्रफिक आहे, याची माहिती गुगल मॅपमुळे मिळते. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात. युजर्सच्या सोयीसाठी येत्या काही महिन्यांत गुगल मॅप्सचे नवे अपडेट येणार आहे. नव्या फिचरमुळे गुगल मॅप मार्गात येणाऱया टोल्सची किंमतही सांगेल. यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच प्रवासादरम्यान किती टोल टॅक्स भरावा लागेल, याची माहिती मिळेल. कंपनी सध्या या फिचरवर काम करत आहे. आधीपासूनच गुगल मॅप देशातील मार्गांवरील टोल ओळखतात आणि दाखवतात. या आधीच्या फिचरचा वापर करत त्याला अपडेट करत युजर्सला टोलची अंदाजे किंमत देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे
Continues below advertisement