खेळ माझा | प्रो कबड्डी | महाराष्ट्राचा गिरीश एर्नाक पुणेरी पलटणचा नवा कर्णधार
ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वासाठी पुणेरी पलटण टीमची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पुणेरी पलटणच्या नव्या जर्सीचं आज पुण्यात अनावरण करण्यात आलं. तसंच पुणेरी पलटणचा कर्णधार म्हणून महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू गिरीश एर्नाकची निवड करण्यात आली. गिरीश एर्नाकसह संदीप नरवाल, नितीन तोमर अक्षय जाधवसारख्या अनुभवी खेळाडूंचा पुणेरी पलटण संघांत समावेश आहे. प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात पुणेरी पलटणची सलामीची लढत यु मुंबाशी होणार आहे. सात ऑक्टोबरला हा सामना चेन्नईत खेळवण्यात येईल.