खेळ माझा | भारत वि.वेस्ट इंडीज राजकोट कसोटी : पृथ्वी शॉचं पदार्पणातच अर्धशतक

मुंबईच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीत आपल्या लौकिकाला साजेसं पदार्पण केलं आहे. त्याने अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या दिवशी उपाहाराला एक बाद 133 धावांची मजल मारता आली. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी पृथ्वी 75 धावांवर खेळत होता. त्याच्या या खेळीला अकरा चौकारांचा साज आहे. कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो आजवरचा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला. तर पुजाराने 74 चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola