खेळ माझा | जागतिक तायजिक्वान स्पर्धेत भारताला सात पदकं
बल्गेरियात नुकत्याच आयोजित तिसऱ्या जागतिक तायजिक्वान स्पर्धेत भारतानं तीन रौप्य आणि चार कांस्य अशी सात पदकांची कमाई केली. भारताच्या तृप्ती चांदवडकरनं एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदकं जिंकली. अथर्व मोडकही दोन कांस्यपदकांचा मानकरी ठरला. शर्वाणी कटके आणि नाओखोम्बा मैतीनं प्रत्येकी एक रौप्यपदक पटकावलं. राजमल्हार व्हटकरनं एक कांस्यपदक मिळवलं.