खेळ माझा | बांगलादेशला धूळ चारुन भारताला आशिया चषक जिंकण्याची संधी
ोहित शर्माची टीम इंडिया आशियाई क्रिकेटवरचं आपलं वर्चस्व दाखवून देण्यासाठी आज दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवर दाखल होईल. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला बांगलादेशशी होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडियानं प्राथमिक साखळीत दोन आणि सुपर फोर साखळीत तीन विजय मिळवून निर्विवादरित्या अंतिम फेरीत धडक मारली.