घे भरारी | आरोग्यासाठी लाभदायक कोथिंबीर | एबीपी माझा
घरोघरात वापरल्या जाणाऱ्या कोथिंबिरीची पाने खूप फायदेशीर असतात हे तुम्हाला माहीत आहे का? कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक सापडतात. कोथिंबीर आपण जरी रोजच्या जेवणात वापरत असलो तरी त्याचे अनेकांना फायदे अनेकांना माहीतसुद्धा नसतील. कोथिंबीरची फक्त पानंच नव्हे तर धणे आणि पावडरसुद्धा अनेक आजार बरे करण्यास उपयुक्त आहे. चला मग जाणून घेऊया कोथिंबीर खाल्याने तुमच्या शरीराला काय काय फायदे होतात.