EXCLUSIVE | नवी दिल्ली | अर्जुन पुरस्कार विजेती राही सरनोबतशी खास बातचित

देशाच्या क्रीडा खात्याकडून देण्यात येणाऱ्य़ा राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांचं आज वितरण करण्यात येणार आहे..भारताची महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि एशियाड सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत यांना आज अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. स्मृती आणि राही या दोघींचा खेळ वेगवेगळा आहे, पण त्यांना जोडणारा एक दुवा आहे, तो म्हणजे त्या दोघीही मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळाडूंचा खेलरत्न, अर्जुन पुरस्कारानं गौरव करण्यात येईल,..त्यासोबतच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना खेलरत्ननं गौरव करण्यात येईल..देशातल्या एकूण 20 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
राही सरनोबतशी बातचित केली आहे, आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी........

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola