Election : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुका जुलैला घेण्यात येणार होत्या. परंतु कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे. ही घोषणा निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.