Zero Hour : ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांचा स्वबळाचा सूर, अंबादास दानवे काय बोलले?

Continues below advertisement

Zero Hour : ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांचा स्वबळाचा सूर, अंबादास दानवे काय बोलले?

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. असे असताना निकाल जाहीर होऊन आज चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांना पडला आहे.   त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आज या शर्यतीतून माघार घेतल्याची माहिती पुढे आली आहे. जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि अमित शाह (Amit Shah) घेतील तो आम्हाला मान्य आहे, असं शिंदेंनी म्हटलंय. त्यानंतर आता भाजपाचा मुख्यमंत्री असणार असे संकेत दिसू लागले आहेत. तर दुसरीकडे अजित दादांच्या राष्ट्रवादीतून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram