WB Election 2021 Phase 4 Voting : बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु, दिग्गजांचं भवितव्य पणाला

Continues below advertisement

कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या चौथ्या टप्पाचं मतदान आज पार पडणार आहे. 10 एप्रिलला होणाऱ्या या मतदानात 382 उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये सीलबंद होणार आहे. आज एकूण 44 जागांसाठी मतदान होईल. त्याच पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर केंद्रीय पथक आणि पश्चिम बंगाल पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रचाराच्या दरम्यान सातत्याने ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय पोलीसांवर टीका केली होती. 

चौथ्या टप्प्यातल्या मतदानाच्या प्रचारतोफा गुरुवारी (8 एप्रिल) थंडावल्या. आज होणाऱ्या मतदानामध्ये उत्तर बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यातल्या 5 जागांसाठी, कूचबिहार जिल्ह्यातल्या 9 जागांसाठी तर दक्षिण बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या 10 जागा, हावडा जिल्ह्यातल्या 9 जागा आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. चौथ्या टप्प्यातल्या मतदारांना खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली होती. आता मतदार आज कोणाला मतं देतात ते 2 तारखेला स्पष्ट होईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram