Goa Elections : Utpal Parrikar यांना पर्याय देण्यात आलेला बिचोली मतदारसंघ आहे तरी कसा ? जाणून घ्या

BJP Goa Candidates List : गोवा विधानसभा (Goa Assembly Elections 2022) निवडणुकींसाठी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पणजीमधून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पण उत्पल पर्रिकरांना भाजपनं अन्य दोन जागांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागलं आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असलेल्या उत्पल यांनी पणजीतून उमेदवारी मागितली होती. पण तिथून विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पणजी ऐवजी अन्य दोन जागांपैकी एका जागेचा पर्याय उत्पल पर्रिकर स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान ज्या बिचोली मतदारसंघाचा पर्रिकरांना पर्याय देण्यात आलाय त्याबद्दल जाणून घेऊयात...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola