Uddhav Thackeray Full PC : देशातील हुकुमशाही संपवण्याला प्राधान्य- उद्धव ठाकरे ABP Majha

Continues below advertisement

Uddhav Thackeray Full PC : देशातील हुकुमशाही संपवण्याला प्राधान्य- उद्धव ठाकरे ABP Majha

हे देखील वाचा

Ravindra Waikar Win Lok Sabha Election : रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी, अमोल कीर्तिकरांचा पराभव

Mumbai Lok Sabha Election Result : मुंबई : महाराष्ट्राचे लोकसभा निकाल (Maharashtra Lok Sabha Election 2024) समोर आले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील जागांवरही ठाकरेंचा डंका पाहायला मिळाला. पण मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघा फेरमतमोजणी करण्यात आली असून यामध्ये शिंदे गटाचे रविंद्र वायकर (Ravindra Waikar) विजयी झाले आहेत. केवळ 48 मतांनी फेरमतमोजणीत रवींद्र वायकरांचा विजय झाला असून अमोल कीर्तिकरांचा (Amol Kirtikar) पराभव झाला आहे. 

 

उत्तर-पश्चिम मतदारसंघात मोठा थरार

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल कीर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये कीर्तिकर आणि वायकर यांचे कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram