पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान, बंगालच्या 30 तर आसाममधील 47 जागांवर मतदान
कोलकाता : पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांत शनिवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. एकू्ण 77 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांचा विचार करता शनिवारी एकूण 1.54 कोटीहून जास्त मतदार आपला हक्क बजावतील.