Tamil Nadu Election Results 2021 : तामिळनाडूमध्ये सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता

Continues below advertisement

Tamil Nadu Election Results देशातील सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे, तामिळनाडू. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही तामिळनाडूमध्ये सत्तापरिवर्तन होणार असल्याचं भाकित वर्तवलं आहे. येत्या काही तासांतच येथील राजकीय गणितांची उत्तरं स्पष्ट होणार आहेत. ज्यानंतर इथं नेमकी सत्ता कोणाची असेल यासंदर्भातील स्पष्टोक्ती होणार आहे. 

तामिळनाडूमध्ये प्रचारादरम्यान, एआयएडीएमके आणि डीएमकेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळाला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी यावेळी निवडणूक जिंकण्याच्याच दृष्टीनं प्रचार केल्याचं दिसलं होतं. 

तामिळनाडूमध्ये मागील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर नजर टाकल्याच स्पष्ट होतं की, इथं एआयएडीएमकेनं बहुमत सिद्ध केलं होतं. राज्यातील 234 जागांपैकी 136 जागांवर पक्षाला विजय मिळाला होता. तर, डीएमकेला 89 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. 2016 मधील निवडणुकांमध्ये काँग्रेसला 8, इंडियन मुस्लिम लीगला 1 जागा मिळाली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram