Grampanchayat Election | सरपंचपदाच्या लिलावाप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाची कडक पावलं
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव असलेलं अहमदनगरमधील राळेगणसिद्धी आणि आदर्श गाव हिवरेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ही दोन्ही गावं पुन्हा चर्चेत आली आहेत. या दोन्ही गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडणार आहेत. कारण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोन्ही गावांना अपयश आलं आहे.